लॉकडाऊन काळात बंद असलेली एसी लोकल सेवा रेल्वेकडून पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे. पण या गारेगार लोकल प्रवासाच्या तिकीटामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला मात्र चटके बसत आहेत. त्यामुळे हे दर कमी करण्याची मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे.
तिकीटांचे दर जास्त
मध्य रेल्वेच्या ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे एसी लोकलच्या फे-यांमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली आहे. एसी लोकलच्या तिकीटांचे दर जास्त असल्याने प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.
(हेही वाचाः दर वाढले तरी मागणी कमी होईना! मार्चमध्ये इंधनाच्या मागणीचा उच्चांक)
रेल्वे मंत्र्यांचे आश्वासन पण…
एसी लोकल पुन्हा सुरू केल्यानंतर लवकरच तिकीटांचे दर कमी करण्यात येतील, असे आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले होते. पण आता दोन महिने होत आले तरी दर कमी झाले नसल्याने रेल्वे प्रवासी संघटनांनी अधिका-यांची भेट घेतली आहे.
सकारात्मक प्रतिसाद
उपनगरीय रेल्वे प्रवासी संघटनेच्या सरचिटणीस लता अरगडे, राजश्री पांजणकर यांच्यासह काही प्रवासी महिलांनी मध्य रेल्वेच्या विभागीय वाणिज्य व्यवस्थापक टी. सुषमा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी दर कपातीसाठी तसेच वेळापत्रकात बदल करण्यासाठी अधिका-यांना पत्र दिले आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती लता अरगडे यांनी दिली आहे.
(हेही वाचाः ऑनलाईन शिक्षणासाठी आता डिजिटल विद्यापीठ! विद्यार्थ्यांना होणार फायदा)
Join Our WhatsApp Community