अहमदनगरच्या बाजारपेठेत रत्नागिरीच्या चांगल्या प्रतीच्या हापूस आंब्यासह केरळ, म्हैसूर, चेन्नई, बंगलोरच्या रसदार आंब्यांची आवक आता वाढली आहे. त्यामुळे आंब्याचे भाव हळूहळू सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्यात येतील असे आहुजा फळ पेढीचे संचालक अज्जुशेठ अहुजा यांनी सांगितले.
( हेही वाचा : कोकणचा राजा आता अॅमेझॉनवर! )
आंबे घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी
गत वर्षापेक्षा परराज्यातून येणाऱ्या आंब्यांना यंदा थोडासा उशीर झाला. मात्र आता हे आंबे आता दाखल झाले आहेत. रत्नागिरी, देवगड, लालबागच्या आंब्याचे भाव आता कमी होऊन स्थिरावले आहेत असे मत जगदीश व कैलास आहुजा यांनी व्यक्त केले. श्री रामनवमीपासून आंबा खाण्यास सुरूवात होते, त्यामुळे बाजारात आंबे घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे.
( हेही वाचा : आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ! नाहीतर… )
मँगो किंग
एक नंबरच्या हापूसचा भाव ४ (चार) डझनासाठी तीन ते चार हजार रूपये इतका असून या व्यतिरिक्त रत्नागिरी, देवगड हापूस, म्हैसूर लालबाग, पायरी, केशर, लंगडा आदी विविध प्रकारच्या आंब्यांची आवक आहुजा यांच्या नवी पेठेतील फळ पेढीत झाली आहे. इतर फळांची बाजारपेठ सोडून नवी पेठेत ४० वर्षांपूर्वी आंब्यांची पेढी सुरु करण्याचे धाडस आहुजा परिवाराने केले होते. त्यास त्यांना यश प्राप्त झाले असून त्यांच्या ग्राहकभिमुख उत्तम व तत्पर सेवेमुळे त्यांना मँगो किंग असे नागरिक संबोधतात.
चांगल्या प्रतीचा आंबा आहे किंवा नाही हे आंबा कापल्यानंतरच समजते व जे विक्रेते आंबा कापून सॅम्पल म्हणून देतात ते अनेकवेळा ग्राहकास मालाची डिलेव्हरी देताना डुप्लिकेट आंब्याची डिलेव्हरी देतात आणि ही फसवणूक होऊ नये यासाठी आंबा खरेदी करताना ग्राहकांनी सावध असावे, असे आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community