अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये ब्रुकलिन सबवे स्टेशनवर मंगळवारी सकाळी गोळीबार झाला. या हल्ल्यात 13 जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोर पसार झाल्याने सर्वत्र हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
At least 13 people have been injured in a shooting incident at a subway station in the New York City borough of Brooklyn, where "several undetonated devices" were recovered, authorities said Tuesday: AFP News Agency
(Pics Source: Reuters) pic.twitter.com/zPIq4tNg7e
— ANI (@ANI) April 12, 2022
13 जण जखमी
न्यूयॉर्कमधील ब्रुकलिनमध्ये साडेआठच्या सुमारास हा हल्ला झाला. यामध्ये 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, न्यूयॉर्क शहरातील सनसेट पार्कच्या 36 व्या स्ट्रीट स्टेशनवर अचानक धूर आल्याची माहिती मिळाली. गोळीबाराचे कारण अद्याप समजू शकले नाही. स्टेशनवर लोक रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. धूरामुळे प्रवाशांना पळून जाता आले नाही. मेट्रो बांधकाम कर्मचाऱ्याचे कपडे परिधान करून हल्लेखोर मेट्रो स्टेशनमध्ये घुसला होता.
People escape the carriage with gasmask-wearing gunman in NY subway pic.twitter.com/H0uUB1g6az
— RT (@RT_com) April 12, 2022
पोलिसांनी तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच न्यूयॉर्कमधील मेट्रो सेवाही बंद करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community