गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंब्र्यातील मदरशांमध्ये झडती घ्या, देशाला पेटवणाऱ्या गोष्टी सापडतील, असे म्हटले होते. त्यावर मुंब्र्याचे आमदार, राष्ट्रवादीचे नेते, मंत्री जितेंद्र आव्हाड मुंब्र्यातील मदरसे आणि मशिदीमध्ये वस्तराही सापडणार नाही, असे म्हटले होते. या विधानावरून राज ठाकरे यांनी ठाण्याच्या उत्तर सभेत आव्हाडांची चांगलीच धुलाई केली.
(हेही वाचा ‘फक्त अजित पवारांच्याच घरी छापा का, एकेक आत जाण्यातही पवारांचा हात नाही ना?’)
राज ठाकरे यांनी मुंब्र्यातील कारवाईची दिली यादी
यावेळी राज ठाकरे म्हणाले की, आव्हाड म्हणतात मदरसा, मशिदीत वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईन. सापडेलच कसा कारण मुसलमान दाढी करतच नाहीत.
- २४ ऑगस्ट २००१ – मुंब्रा-कौसा परिसरात सिमी नावाच्या संघटनेचे ६ हस्तक सापडले.
- २० डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ल्याप्रकरणी कुख्यात आतंकवादी अबू आजम याला मुंब्र्यातून अटक
- १६ मार्च २००२ रोजी मुब्र्यातून हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेच्या ४ अतिरेक्यांना अटक
- कोणा एक नेत्याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी तिघांना अटक
- २३ जानेवारी २००४ रोजी एक दहशतवादी गजाआड
- गुजरात पोलिसांच्या चकमकीत ठार झालेली इशरत जहाँ मुंब्र्यात राहणारी होती
- २०११६ मध्ये आयसिसचा अतिरेकी ताब्यात घेतला तो मुंब्र्यात राहणारा होता
- १७ एप्रिल २००३ रोजी लष्कर ए तोयबाच्या २ अतिरेक्यांना अटक
- १६ मी २००३ रोजी मुलुंड बॉंबस्फोटातील आरोपी महंमद मईमुद्दीन याला मुंब्र्यातून अटक
- २६ जानेवारी २०१३ रोजी एक अतिरेक्याला अटक
(हेही वाचा ‘3 मे पर्यंत भोंगे उतरले नाहीत तर…’ राज ठाकरेंचे अल्टिमेटम)
देशभरातील मदरशांमध्ये जातीयवाद
हे सगळे मुंब्र्यातील आहेत जेथून आव्हाड निवडून येतो, या अशा अनेक असंख्य घटना देशातील मदरशांमध्ये घडत आहेत. त्यामागे पाकिस्तान आहे, यात प्रामाणिक मुसलमान भरडले जात आहेत. पवार म्हणतात, मी जातीयवाद भडकावतो, हिंदुत्वाची भूमिका मी आज घेतलेली नाही. पाकिस्तानी कलावंताना लाथा मरणारा पक्ष मनसे होता, आझाद मैदानात रझा अकादमीने हिंसाचार केला, महिला पोलिसांवर अत्याचार केला, कोणी प्रतिक्रिया दिली नाही, फक्त मनसेने मोर्चा काढला आणि मुंबई पोलीस आयुक्त अरुण पटनाईक यांना हटवले, हे पटनाईक तेव्हा पोलिसांना म्हणाले होते मुसलमानांवर कारवाई करू नका, मनसेने काढलेला जबरदस्त मोर्चा या पटनाईकसाठीच होता.
(हेही वाचाः ‘वसंतसेना ते शरदसेना’ असा शिवसेनेचा प्रवास! संदीप देशपांडेंनी घेतला समाचार)
संजय राऊत लवंडे!
गुढीपाडव्याच्या सभेनंतर गरफटले. प्रॉपर्ट्या जप्त होऊ लागल्या तेव्हा हे पत्रकार परिषदेत शिव्या देऊ लागले. एक वर्तमानपत्राचा संपादक अश्लील भाषेत शिव्या देऊ लागला. कारण त्यांच्या अंगाशी आले. ते सेनेचे की राष्ट्रवादीचे हेच कळत नाही. माझे आजोबा या लोकांसाठी म्हणायचे लवंडे. यावर अनुस्वार आहे. आपल्याकडे पत्रावळी असते, त्यावर द्रोण ठेवतात, त्यात वरण ओतले की ते द्रोण लवंडते. त्याप्रमाणे हे कधी राष्ट्रवादीकडे तर कधी सेनेकडे लवंडते. असे हे लवंडे.
(हेही वाचा शरद पवार शिवरायांचे नाव कधी घेत नाहीत! राज ठाकरेंचा गंभीर आरोप)
Join Our WhatsApp Community