धनंजय मुंडेंना ह्रदयविकाराचा सौम्य झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

135

महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची प्रकृती मंगळवारी रात्री अचानक बिघडली. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय मुंडे यांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयात पोहोचून मुंडे यांची भेट घेतली.

( हेही वाचा: शरद पवार शिवरायांचे नाव कधी घेत नाहीत! राज ठाकरेंचा गंभीर आरोप )

काळजी करण्याचे कारण नाही

धनंजय मुंडे यांची प्रकृती पूर्ण स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर माहिती देताना सांगितले. त्यांच्या सर्व आवश्यक तपासण्या झाल्या असून सर्वकाही ठीक आहे, असे टोपे म्हणाले. मंत्री धनंजय मुंडे सोमवारी परभणीला गेले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांचा जनता दरबार होता. कामाच्या ताणामुळे असे होऊ शकते, असे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. पुढील तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयात ठेवण्यात येणार असल्याचेही टोपेंनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.