खाद्यतेल महागाईचा ग्राहकांवर परिणाम; इतके भारतीय वळले कमी दर्ज्याच्या खाद्यतेलाकडे

137

सध्या इंधन दरवाढीने देशातील उच्चांक गाठला आहे. त्यातच खाद्यतेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. त्याचे परिणाम आता देशातील अल्प उत्पन्न तसेच, मध्यम उत्पन्न असणा-या कुटुंबांवर दिसून येत आहेत. आता अनेक कुटुंबे ही बचत करण्याच्या हेतूने कमी दर्ज्याच्या खाद्यतेलालकडे वळालेले दिसून येत आहेत. नुकत्याच केलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणात २९ टक्के नागरिक हे कमी दर्ज्याच्या खाद्यतेलाकडे वळाल्याची बाब उघड झाली आहे.

भारतीय असा करताहेत जुगाड

समुदाय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकल सर्कलने नुकत्याच केलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणात २९ टक्के प्रतिसादकर्त्यांनी असे म्हटले आहे की ते वाढलेल्या किमतीत खाद्यतेल खरेदी करू शकत नाहीत आणि म्हणून ते कमी दर्जाचे स्वस्त तेल खरेदी करत आहेत. तसेच, १७ टक्के लोकांनी सांगितले की त्यांना महाग खाद्यतेल खरेदी करण्यासाठी त्यांचे इतर खर्च कमी करावे लागतील. तर, ५० टक्के लोकांनी आपले इतर खर्च कमी करून महागड्या किमतीत खाद्यतेल खरेदी केल्याचे सांगितले. २४ टक्के लोकांनी तेलाचा वापर कमी केल्याचे सांगितले. सर्वेक्षणात ३५९ जिल्ह्यांतील ३६ हजार लाेकांशी संवाद साधण्यात आला.

तेलाचा वापर केला कमी

खाद्यतेलांच्या वाढत्या किमती पाहता गृहिणींनी आता फोडणीसाठी कमी तेल वापरण्यास सुरुवात केली आहे. तसेच, या कुटुंबांची शेंगदाणा तेलाला सर्वाधिक पसंती आहे, 29 टक्के नागरिक शेंगदाणा तेल खरेदी करतात.

( हेही वाचा: सीएनजी आणि घरगुती गॅसचे दर पुन्हा कडाडले, जाणून घ्या नवे दर! )

या तेलांना सर्वाधिक पसंती

  • 21 टक्के शेंगदाणा तेल
  • 18 टक्के मोहरी तेल
  • 25 टक्के सूर्यफूल तेल
  • 9 टक्के खोबरेल तेल
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.