पूर्व उपनगर होईल पूर उपनगर!

137

कोसळलेल्‍या संरक्षण भिंती, गाळाचे ढिग, अद्याप कामाला न झालेली सुरूवात आणि हातात असलेला महिनाभराचा कालावधी पाहता ही कामे कधी पूर्ण होणार असा सवाल करत जर पावसाळयापूर्वी ही कामे पूर्ण न झाल्यास पूर्व उपनगर हे पूर उपनगर होईल, अशी भिती भाजपा नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी व्‍यक्‍त केली आहे.

( हेही वाचा : MPSC मध्ये ८ हजार पदांची मेगा भरती! )

सेवा सप्‍ताह निमित्‍ताने आयोजित मुंबईतील नालेसफाईच्या पाहणी दौ-यात बुधवारी पाचव्‍या दिवशी भाजपा नेते आमदार ऍड. आशिष शेलार, खासदार मनोज कोटक, महापालिकेचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, प्रवक्‍ते भालचंद्र शिरसाट यांनी मुलुंड ते घाटकोपर दरम्‍यानच्या नाल्‍याची पाहणी केली.

New Project 1 12

पूर्व उपगरात नाल्‍यांची स्थिती चिंताजनक

मुलुंड येथील तांबे नगर नाल्‍यातील गाळ काढण्‍यास अद्याप सुरूवातच झालेली नाही. तर रामगड नालाही गाळाने भरलेला पहायला मिळाला. एपीआय नाल्‍यामध्‍ये जे बॉक्‍स नाला बांधण्‍याचे काम सुर आहे ते अर्धवट असून ते पावसाळयात तसेच राहिले तर भांडुप परिसराला पूराचा फटका बसेल. ऑक्‍सिजन नाल्‍याची संरक्षण भिंत कोसळली आहे. त्‍यामुळे तिथले चित्रही असेच भयावह आहे. या नाल्‍याच्या मधेच एक भिंत आडवी असल्‍याने पाण्‍याचा प्रवाह अडला गेला आहे. तर पूर्व द्रुतगती महामार्गावरील महत्‍वाचा असणारा घाटकोपर लक्ष्मी बाग नाल्‍यात अद्यापही कामाला सुरूवात झालेली नाही. या नाल्‍यावरुन रस्‍ता जात असल्‍याने वेळीच साफ केला नाही, तर पूर्व द्रुतगती महामार्गासह घाटकोपर परिसर जलमय होण्‍याची भिती आहे. एकूणच पूर्व उपगरात नाल्‍यांची स्थिती चिंताजनक असल्याची भीती या पाहणीनंतर शेलार यांनी व्यक्त केली.

New Project 2 11

यावेळी आमदार मिहिर कोटेचा, नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेविका समिती कांबळे, साक्षी दळवी,.सारिका पवार यासह प्रविण दहितूले, मंगेश पवार आदींसह पक्षाचे स्‍थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.