पंतप्रधान मोदींनी कॅशलेस, डिजिटल व्यवहारांना प्राधान्य द्या असे आवाहन समस्त देशवासीयांना केले होते. अलिकडे अनेकजण ऑनलाइन व्यवहारांसाठी UPI पेमेंट पद्धतीचा वापर करतात. परंतु अनेकदा ऑनलाइन व्यवहार करताना फसवणुक होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही जर UPI वापरत असाल तर या खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा. यामुळे तुमचे पैसे सुरक्षित ठेवण्यास मदत होईल.
( हेही वाचा : पुन्हा धावू लागली एसटीची चाके, इतके कर्मचारी झाले कामावर हजर )
UPI पेमेंट करताना या गोष्टींची काळजी घ्या
- UPI पिन कोणासही सांगू नका तसेच पैसे पाठवताना कोणी तुम्हाला तुमचा पिन टाकण्यास सांगत असल्यास सावधगिरी बाळगा.
- कॉल करून UPI पासवर्ड, पिन विचारल्यास याविषयी माहिती देऊ नका.
- तुमच्या संगणकावर अँटी-व्हायरस आणि बायोमेट्रिक ओळख सॉफ्टवेअर ठेवा.
- तुमच्या वैयक्तिक माहितीतील कोणत्याही बदलांची माहिती तुमच्या बँकेला द्या.
- मेल आणि व्हॉट्सअॅपवर सणासुदीच्या काळात आकर्षक ऑफर्स मिळतात. अशा लिंक्स तुम्हाला कॅशबॅक देतात.
- तुमचा पिन आणि इतर तपशील प्रविष्ट करण्यास सांगतात. त्यामुळे अशा लिंक्सची काळजी घ्या आणि त्या उघडू नयेत.
- सायबर गुन्हेगारांपासून रक्षण करण्यासाठी वेळोवेळी UPI पिन आणि अॅप अपडेट करा. हा पिन चार किंवा सहा अंकांचा असतो.
पैसे ट्रान्सफर करण्यासाठी भीम अॅप हा सरकारने लॉंच केला होता. या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम सहज जाणून घेऊ शकता. तसेच QR कोड स्कॅन करून तुम्ही भीम अॅपच्या मदतीने पेमेंट करू शकता. भीम अॅप अगदी सुरक्षित असून याची सेवा २४ तास उपलब्ध असते.
Join Our WhatsApp Community