उद्धव ठाकरे मास्टरमाईंड, संजय राऊत तर प्रवक्ता! किरीट सोमय्यांचा घणाघात

120

न्यायालायच्या भावनेच्या विरुद्ध ते आंदोलन करत आहेत, देव त्यांना चांगील बुद्धी देवो. हे जे मागील चार-पाच दिवस नाटक सुरू होते, ते उद्धव ठाकरे यांनी चालवले होते, संजय राऊत प्रवक्ता आहे, मास्टरमाईंड उद्धव ठाकरे आहेत. कारण ठाकरेंच्या मुलांचे, त्यांच्या पत्नीचे घोटाळे ज्यावेळी बाहेर यायला लागले. म्हणून कसेही करून किरीट सोमय्याला तुरुंगात टाका आणि त्याचे तोंड बंद करा. उद्धव ठाकरे आपल्या डर्टी डझनचे घोटाळे बाहेर येणार, काढणार आणि शिक्षा होईपर्यंत किरीट सोमय्या असाच सक्रीय राहणार, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला.

आयएनएस विक्रांत निधी अपहार प्रकरणामुळे अडचणीत सापडलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला. सत्र न्यायालयाचा आदेश चुकीचा असल्याचा दावा करत अटक टाळण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाकडून दिलासा मिळताच बेपत्ता झालेले किरीट सोमय्या माध्यमांसमोर आले. त्यांनी ‘विक्रांत’मध्ये एक दमडीचाही घोटाळा आम्ही केलेला नाही, असे सांगितले. या प्रकरणावरून त्यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील त्यांनी यावेळी निशाणा साधला.

(हेही वाचा आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांना दिलासा, मात्र…)

सीएमओचे काम खोटा एफआयआर नोंदवायचे 

मुंबई उच्च न्यायालयाने फक्त दिलासा दिला एवढच नाही तर त्यांनी जे प्रश्नचिन्ह निर्माण केले. तोच प्रश्न मी मागील आठ दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना विचारत आहे. सीएमओचे काम केवळ माफियागिरी पोलिसांना करायला लावायची, खोटा एफआयआर नोंदवायचा, अटक करून तुरुंगात टाकायची भाषा वापरायची हे महाराष्ट्र पहिल्यांदा अनुभवत आहे. विक्रांतमध्ये एक दमडीचा घोटाळा आम्ही केलेला नाही. ५८ कोटींची भाषा संजय राऊतने वापरली होती आणि आठही आरोप पैकी एकाचाही कागद नाही, पुरावा नाही. केवळ स्टंटबाजी करायची, दोन-पाच दिवस माध्यमांचे लक्ष वेधून घ्यायचे, न्यायालयावर माझा विश्वास आहे, न्याय मिळायची सुरुवात झाली आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

म्हणून होतो नॉट रिचेबल 

महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या घोटाळ्याचा होमवर्क करण्यासाठी आपण नॉट रिचेबल होतो. आता पुढील नंबर मंत्री अनिल परब, हसन मुश्रीफ, यशवंत जाधव यांचा असणार आहे, असेही सोमय्या म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.