आर्यन खान प्रकरणातील दोन तपास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. विश्व विजय सिंग आणि आशिष रंजन प्रसाद अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. हे दोन्ही अधिकारी या प्रकरणाशी संबंधित काम पाहत होते. या दोघांचे निलंबन का करण्यात आले, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. या अधिकाऱ्यांची दक्षता विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे.
कॉर्डिलिया क्रूझवरून ८ जण ताब्यात
२ ऑक्टोबर रोजी मुंबईहून गोव्यात जाणा-या कॉर्डिलिया क्रूझवर एनसीबीने छापा मारला होता. त्यावेळी या जहाजावर रेव्ह पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यामुळे एनसीबीच्या अधिका-यांनी बॉलिवूडचा बादशहा शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा या तिघांसह एकूण ८ जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर चार दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले.
(हेही वाचा फरार जयश्री पाटलांकडे एसटी कामगारांचे ८० लाख रुपये)
नवाब मलिकांनी केलेला आरोप
22 अधिकारी प्रवाशी बनून क्रूझवर गेले. त्यावेळी क्रूझवर 1800 लोक होते. त्यामधूनच अंमली पदार्थ प्रकरणात 8 लोकांना आम्ही शोधून काढले, मात्र हे सगळे प्रकरण म्हणजे एनसीबीने रचलेला बनाव आहे असा आरोप नवाब मलिक यांनी केला. एवढेच नाही तर समीर वानखेडे यांच्या व्यक्तीगत आयुष्यावर आणि त्यांच्या कमाईवर, जात प्रमाणपत्रावरही चांगलेच प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर या प्रकरणातून समीर वानखेडे यांना बाजूला कऱण्यात आले. आता आज जवळपास सहा महिन्यांनी या प्रकरणातल्या एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community