शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा न्यायालयाच्या भूमिकेवर बोट ठेवले आहे. डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बोलताना, त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. एकाच पक्षाच्या नेत्यांना न्यायालयाचा दिलासा कसा काय मिळतो? असा सवाल राऊतांनी यावेळी उपस्थित केला. तसेच, न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीचे लोक आहेत असे म्हणत राऊतांनी गंभीर आरोप केला आहे.
दिलासा एकाच पक्षाच्या नेत्यांना कसा मिळतो
संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना मिळालेल्या अटकपूर्व जामिनावर संताप व्यक्त केला आहे. गुन्हा हा गुन्हाच असतो. घोटाळा कितीही कोटींचा असो. सोमय्यांना न्यायालयाने अद्याप निरपराध ठरवले नाही. मात्र न्यायालयात एका विशिष्ट पक्षाच्या लोकांनाचा दिलासा मिळतो. पुन्हा देश फाळणीच्या दिशेने जातोय की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
( हेही वाचा: केमिकल फॅक्ट्रीमध्ये मोठा स्फोट, भीषण आगीत 6 जणांचा मृत्यू तर 13 जखमी! )
वीर सावरकरांना भारतरत्न द्या
अखंड भारताला कोणाचाच विरोध नाही. कोणताही पक्ष त्याला विरोध करणार नाही. पण याआधी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या कारण त्यांचे अखंड भारताचे स्वप्न होते. तसेच, पाकव्याप्त काश्मिरही ताब्यात घ्या. पाकिस्तानही ताब्यात घ्या असेही ते यावेळी म्हणाले.
Join Our WhatsApp Community