मराठा आरक्षणाबाबत केलेलं ते वक्तव्य सदावर्तेंना भोवलं… सातारा पोलिसांनी घेतला ताबा!

146

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सध्या वकील गुणरत्न सदावर्ते अटकेत आहेत. आता त्यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दीड वर्षांपूर्वी मराठा आरक्षणाबाबत केलेले वक्तव्य आता त्यांना भोवले आहे. मराठा आरक्षणाबाबत सदावर्तेंनी उदयन राजे भोसले आणि संभाजीराजेंवर आक्षेपार्ह टीका केली होती. आता याच प्रकरणी सातारा पोलिसांनी आर्थर रोड जेलमधून सदावर्तेंचा ताबा घेतला आहे.

सदावर्तेंना भोवले ते वक्तव्य

एसटी कर्मचा-यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपतींच्या घराण्याबाबत बदनामी करणारे वक्तव्य केले होते. दोन वर्षांपूर्वी साता-यामधील राजेंद्र निकम यांनी एक तक्रारी अर्ज दाखल केला होता. या अर्जात जी राजघराणी आहेत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान सदावर्ते यांनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले होते. त्यानंतर त्यांच्यावर सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल दोन वर्षांनी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

( हेही वाचा: आम्ही त्या बंगल्याजवळ चप्पला सोडल्या, सिल्वर ओक वरील हल्ला पूर्वनियोजित कट )

न्यायालयात हजर केले जाणार?

गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याअनुषंगाने सातारा पोलीस गेल्या चार दिवसांपासून मुंबई पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून होते.  त्यानुसार, आता पुढील तपासासाठी सातारा पोलीसांनी सदावर्तेंचा ताबा घेतला आहे. आता साता-यात सदावर्तेंना न्यायालयात हजर केले जाऊ शकते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.