पुढील १५ वर्षांत अखंड भारत होईल, पण…! मोहन भागवतांचे महत्वाचे विधान

123

हरिद्वारमध्ये येथे संतांच्या संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संत आणि ज्योतिषांच्या मते २० ते २५ वर्षात भारत पुन्हा एकदा अखंड भारत होईल. पण जर आपण सर्वांनी मिळून या कार्याला गती दिली तर १० ते १५ वर्षात अखंड भारत होईल असे म्हटले आहे.

हिंसेबद्दल बोलू, पण हातात दंडूका घेऊन

हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. आपण अहिंसेबद्दल बोलू, पण हातात दंडूका घेऊन बोलू. आपल्या मनात कसलाही द्वेष किंवा वैर नाही, पण जग शक्तीला मानत असेल तर काय करणार? असेही मोहन भागवत यांनी म्हटले आहे. सनातन धर्माला विरोध करणाऱ्या तथाकथित लोकांचेही यात सहकार्य आहे, त्यांनी विरोध केला नसता, तर हिंदू जागा झाला नसता, भारताचा उदय झाला तर तो धर्मानेच होईल. धर्माच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले तरच भारताचा उदय होईल. भारत वेगाने प्रगती करत आहे. त्यामध्ये कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर तो संपेल असंही मोहन भागवत यांनी म्हटले आहे. हरिद्वारमधल्या एका कार्यक्रमात संतांनी संघप्रमुखांसमोर देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्याची मागणी लावून धरली. पूर्णानंद आश्रमामधील ब्रह्मलीन महामंडलेश्वर श्री 1008 स्वामी दिव्यानंद गिरी यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि श्री गुरुत्रय मंदिराचे लोकार्पण मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

(हेही वाचा महाविद्यालयांनी स्वायत्तता स्वीकारावी व राष्ट्रीय मानांकन सुधरवावे, राज्यपालांचे प्रतिपादन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.