भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी २०२२ च्या मान्सूनचे पहिले अंदाजपत्रक जारी केले आहे. यावर्षी नैऋत्य मोसमी हंगाम म्हणजेच जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : उन्हाळी सुट्टीत गावी जाताय? मध्य रेल्वेने सोडल्या १८ साप्ताहिक विशेष गाड्या )
यंदा सामान्य पाऊस असेल. जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरी 868.6 मिमी पाऊस पडेल. सरासरीच्या तुलनेत यंदा देशात ९९ टक्के पाऊस अपेक्षित आहे, असे यंदाच्या मान्सूनबद्दल अंदाज व्यक्त करताना, हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे यंदा चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
देशाच्या अनेक भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता
भारतीय हवामान खात्याने (IMD) जारी केलेल्या मान्सूनच्या अंदाजानुसार यावर्षी देशातील अनेक भागात चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.
Good News:#Monsoon2022 for June to Sept for all India is going to be Normal (96% to 104%)
Quantitatively it will be 99% of Long Period Average of the country's rainfall.
LPA for all India is revised this year and its calculated based on period of 1971-2020
Revised LPA is 87 CM. pic.twitter.com/VpkaYosQ95— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 14, 2022
देशाच्या या भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो
भारताचा उत्तर भाग, मध्य भारत, हिमालयाच्या पायथ्याशी आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पूर्वोत्तर, वायव्य भारतातील काही भाग आणि द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील भागांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभाग ‘मे’ मध्ये आणखी एक अंदाज जारी करेल
भारतीय हवामान विभाग (IMD) मे अखेरीस मान्सून हंगामासाठी आणखी एक अंदाजपत्रक जारी करेल. दरवर्षी दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मान्सून पहिला दाखल होतो.
Join Our WhatsApp Community