इन्फोसिस कंपनीला ८० हजार कामगारांचा रामराम

154
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या इन्फोसिस कंपनीला मोठा झटका बसला आहे. या कंपनीतील तब्बल ८० हजार कर्मचाऱ्यांनी कंपनीला राम राम ठोकला आहे. मागील तीन महिन्यांत कंपनीला ही गळती लागली आहे. अचानक कंपनीतील टॅलेंट कमी झाल्यामुळे कंपनीच्या उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे. कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या सोडणाऱ्यामध्ये इन्फोसिस कंपनीने टीसीएस कंपनीला मागे टाकले आहे.

टॅलेंट खेचून आणण्यासाठी जास्त पगार ऑफर

आयटी क्षेत्रातील कंपन्या कायम एकमेकांमधील कर्मचारी फोडत असतात, दुसऱ्या कंपनीतील टॅलेंट खेचून आणण्यासाठी जास्त पगार ऑफर केला जातो. त्यांना मोठी पदे दिली जातात, कर्मचारी इकडच्या होडीतून तिकडच्या होडीत उड्या मारतात. इन्फोसिसने बुधवारी, १३ एप्रिल रोजी जानेवारी ते मार्च २०२२ तिमाहीचे निकाल घोषित केले. यामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे. देशातील इन्फोसिस ही टॅलेंटेड लोकांची खाण असल्याचे म्हटले जाते. जगभरात इन्फोसिसचे नाव सर्वात पुढे आहे, असे असले तरी हा टॅलेंट इन्फोसिसला सोडून जात असल्याचे चित्र आहे.

कंपनीने २२००० नवे कर्मचारी घेतले

इन्फोसिसने दिलेल्या माहितीनुसार गेल्या तीन महिन्यांत कंपनीतून २७.७ टक्के कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे. हा आकडा गेल्या १२ महिन्यांत नोकरी सोडून जाणाऱ्यांपेक्षा खूप जास्त आहे. सतत तिसऱ्या तिमाहीत २० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली आहे. ऑक्टोबर-डिसेंबरच्या तिमाहीत २५.५ टक्के कर्मचाऱ्यांनी इन्फोसिस सोडली. जुलै-सप्टेंबरमध्ये २०.१ टक्के आणि एप्रिल-जूनमध्ये १३.९ टक्के कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली. कंपनीने २०२१-२२ मध्ये एकूण ५२,८२२ लोकांना नोकरी दिली आहे. कंपनीमध्ये मार्चपर्यंत एकूण २ लाख ९७ हजार ८५९ कर्मचारी होते. ८० हजारच्या बदल्यात कंपनीने २२००० नवे कर्मचारी घेतले आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.