मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ३.९८ किलो ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. याची किंमत २४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान यासंदर्भात दक्षिण आफ्रिकन नागरिकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. अंमली पदार्थ नियामक पथकाने (एनसीबी) ही कारवाई केली आहे.
( हेही वाचा : ऊर्जा व महसूल मंत्रालयाच्या वादात होरपळतोय महाराष्ट्र! )
जोहान्सबर्ग येथील रहिवासी
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एनसीबीने बॅगेज ट्रॉलीमध्ये ड्रग्ज लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडे जवळपास ४ किलो वजनाचे हेरॉईन सापडले आहे. बाजारभावाप्रमाणे याची किंमत २४ कोटी रुपयांच्या घरात असल्याची माहिती आहे. जोहान्सबर्ग येथील रहिवासी असलेला आरोपी हा इथिओपियाची राजधानी आदिस अबाबाहून आला होता.
Join Our WhatsApp Community