प्रत्येक रविवारी मध्य रेल्वेवर सुटीच्या दिवशी रेल्वे ट्रक आणि ओव्हरहेड वायर यांच्या दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेतला जातो. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होत असतो. येत्या रविवारी, १७ एप्रिल रोजीही मध्य रेल्वेवर ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्याआधी मेगाब्लॉकचे वेळापत्रक तपासण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.
(हेही वाचा यंदा ९९ टक्के पाऊस; मान्सूनचा अंदाज जाहीर)
कोणत्या मार्गावर लोकल असणार बंद?
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार अप आणि धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जाऊन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
- घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत
- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकरीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
- पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रेहून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
- तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.
- हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.
हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे. सुट्टीच्या दिवशी अनेक जण फिरण्यासाठी घराबाहेर पडतात, येत्या रविवारीसुद्धा मुंबईत मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार आहे.
(हेही वाचा काकाविरुद्ध पुतण्याने वाजवला ‘भोंगा’)
Join Our WhatsApp Community