एसटीचे नियमित वेळापत्रक १८ एप्रिलपासून होणार लागू

161

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. पाच महिन्यानंतरही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असून, कामावर परतलेले नाहीत. मात्र आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला असून, रत्नागिरी डेपोतील कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील पूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार १०० टक्के फेऱ्या लवकरच सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारपासून एसटीची सेवा नियमित वेळापत्रकानुसार सुरू होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

( हेही वाचा : रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक! पहा वेळापत्रक… )

कोणतीही कारवाई न करता हजर करून घ्या

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी दिवाळीपासून संप पुकारला होता. या संपात रत्नागिरी विभागातील तीन हजारांहून अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यानच्या कालावधीत १ हजार कर्मचारी कामावर हजर झाले. न्यायालयाने विलीनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट केले असून कामगारांवर कोणतीही कारवाई करू नका असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरीतील कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतली आहे. सध्या ९९६ कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. २ हजार २३६ कर्मचारी संपात सहभागी आहेत. लवकरच १ हजाराहून अधिक कर्मचारी हजर होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.