हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवशी लागलेल्या बॅनरवरुन आता नव्या वादाला तोंड फूटले आहे. हसन मुश्रीफ यांच्या नावात श्रीरामाचे नाव चित्रित केल्यावरुन भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी आक्षेप नोंदवला आहे. आता या प्रकरणात समरजीत घाटगे यांनी पोलिसांत तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. प्रभू श्रीराम हे बहुजनांचे आराध्यदैवत आहेत. हसन मुश्रीफ स्वत: ला राम समजू लागले आहेत का? असा सवालही समरजित घाटगे यांनी केला आहे.
हे आहे प्रकरण
हसन मुश्रीफ यांचा 10 तारखेला वाढदिवस होता. याच दिवशी रामनवमीसुद्धा होती. हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ यांनी पेपरला जाहिरात आणि पत्रक छापली होती. या पोस्टरवरील हसन मुश्रीफ यांचा फोटो आणि त्यांचे नाव हसन यात बदल करुन राम नवमी असे केले आहे. त्यामुळे समरजितसिंह घाटगे यांनी या नावाबद्दल आक्षेप घेतला आणि याविरोधात पोलिसांत तक्रार करणार असल्याचेही म्हटले आहे.
( हेही वाचा: पोस्टर वाॅर कायम! आता मनसेचे शिवसेनेला चोख प्रत्युत्तर )
मुश्रीफ अडचणीत येणार?
हसन मुश्रीफांच्या नावात राम हा शब्द दाखवला गेल्यामुळे राम भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याचे समरजीत घाटगे यांनी म्हटले आहे. तसेच, पोलिसातही तक्रार करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या वाढदिवसाच्या जाहिरातीमुळे आता हसन मुश्रीफ अडचणीत येण्याची शक्यता आहे.