शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले एसटी कर्मचा-यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. सदावर्ते यांना शुक्रवारी सातारा न्यायालयाकडून चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्रपतींच्या वंशजांबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चार दिवसांची पोलिस कोठडी
छत्रपती संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह केलेल्या विधानाबाबत सदावर्ते यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सदावर्ते यांना शुक्रवारी सातारा न्यायालयात दाखल करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सदावर्ते यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांनी केलेल्या विधानांबाबत आता सातारा पोलिसांकडून चौकशी करण्यात येणार आहे.
(हेही वाचाः सदावर्ते करणार पोलिस व्हॅनमधून महाराष्ट्र भ्रमण? ठिकठिकाणी तक्रारी दाखल)
सदावर्तेंना मोठा दणका
या प्रकरणाच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना दोन वर्षांपूर्वी चौकशीसाठी बोलावण्यात आले असताना, ते चौकशीसाठी गैरहजर राहिले होते. गुरुवारी त्यांना सातारा पोलिसांनी आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेतले. याआधी गिरगाव न्यायालयाने त्यांना दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. पण आता सातारा न्यायालयाने थेट चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यामुळे सदावर्तेंसाठी हा फोर मोठा दणका असल्याचे म्हटले जात आहे.
कोल्हापुरातही गुन्हा दाखल
मराठा आरक्षणाविरोधात लढण्यासाठी बेकायदेशीररित्या पैसे गोळा केल्याचा आरोपही सदावर्ते यांच्यावर करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिस ठाण्यात सदावर्ते यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठी सदावर्ते यांना साता-यानंतर कोल्हापूर येथेही नेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
(हेही वाचाः संपामुळे एसटी कर्मचारी झाले कर्जबाजारी, सरकारला दया येणार कधी?)
Join Our WhatsApp Community