कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून विशेष ट्रेन बंद करण्यात आल्या होत्या. कोरोनामुळे प्रभावित झालेल्या या ट्रेनमध्ये राॅयल राजस्थान, महाराजा एक्सप्रेस, पॅलेस ऑन व्हिल्स, गोल्डन चॅरिएट आणि डेक्कन ओडिशी लक्झरी यांचा समावेश आहे. आता या रेल्वे पुन्हा प्रवाशांच्या सेवेत धावणार आहेत.
या महिन्यात सुरु होणार रेल्वे
गेल्या दोन वर्षांपासून रेल्वे सेवा बंद होती. आरटीडीसीच्या एका अधिका-याने मुलाखतीत म्हटले की, येत्या सप्टेंबर महिन्यापासून कोविड निर्बंधांसह रेल्वे सुरू करण्याच्या नियोजनात आहोत. फेस मास्क, सामाजिक अंतर आदी निर्बंधांसह एक्सप्रेस सुरु केली जाणार आहे. सध्या आंतरराष्ट्रीय प्रवास सुरु होत आहे, ही खूप मोठी घटना असल्याचेही अधिका-याने म्हटले आहे. कारण, या रेल्वेमधून प्रवास करणारे बहुसंख्य प्रवासी हे विदेशांतीलच आहेत.
बुकींग सुरु
ऑक्टोबरपासून सुरु होणा-या या राजेशाही रेल्वेचे बुकींग आधीच झाले आहे. वर्ष 2019-2020 मध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांनी केलेले बुकींग कोविड-19 मुळे रद्द झाले. असे आरटीडीसीच्या अधिका-याने म्हटले आहे.
…म्हणून पुन्हा धावू लागणार लक्झरी रेल्वे
- आता कोरोना जवळपास संपल्यासारखा आहे. सध्या रेल्वे आणि विमान प्रवास नव्या मार्गदर्शक सूचनांसह व उत्तम सेवांसह सुरु होत आहे.
- थोडक्यात सांगायचे तर प्रवासी राजेशाही थाटात या लक्झरी रेल्वेतून प्रवासाचा आनंद घेऊ शकणार आहेत.
- विदेशी पर्यटक पुन्हा आल्यामुळे लक्झरी रेल्वे पुन्हा धावू लागल्या आहेत.