सोने – चांदीच्या दरात दररोज बदल होताना दिसत आहेत. सणासुदीच्या काळात तर दरांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळतेच. मात्र आता काही दिवस सोन्याच्या दरात घसरण झाली होती. परंतु शुक्रवारी पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. शुक्रवारी २२ कॅरेटच्या १० ग्रॅम सोन्याची किंमत ४९ हजार ५५० रुपयांवर स्थिरावली आहे. तर चांदीचा दर १० ग्रॅमसाठी ७०० रुपये इतका आहे. शहरांनुसार सोने-चांदीच्या दरातही बदल झालेला दिसून येतो. जाणून घेऊया सोने-चांदीचे शुक्रवारचे (आज) दर.
( हेही वाचा: महिला का सोडताहेत नोक-या? सर्वेक्षणातून माहिती आली समोर )
सोन्याचा शुक्रवारचा (आज) दर : (१० ग्रॅमसाठी)
- मुंबई – २२ कॅरेट – ४९,५५० रुपये, २४ कॅरेट – ५४,०६० रुपये
- पुणे – २२ कॅरेट – ४९,५८० रुपये, २४ कॅरेट – ५४,०९० रुपये
- नागपूर – २२ कॅरेट – ४९,५८० रुपये, २४ कॅरेट – ५४,०९० रुपये