मध्य रेल्वेच्या दादर-माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान शुक्रवारी, रात्री ९.४५ वाजता दोन एक्स्प्रेस एकाच ट्रॅकवर आल्या. पदुचरी एक्स्प्रेस सीएसएमटीच्या दिशेने जात होती, त्याचवेळी कल्याणच्या दिशेने येत असलेली गदग एक्स्प्रेस ट्रॅक क्रॉसिंगवर एकाच ट्रॅकवर आल्या. यावेळी गाडीची धडक होऊ नये म्हणून पदुचरी एक्स्प्रेसच्या मोटरमनने तातडीचा ब्रेक लावला. त्यामुळे या गाडीचे तीन डबे बाजुला कलंडले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही, मात्र रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला. या दुर्घटनेमुळे अप दिशेकडील लोकल सेवा जवळपास दीड तास ठप्प झाली होती, तर डाऊन मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरु होती. जलद मार्गावरील कल्याण दिशेकडील लोकल धीम्या मार्गावरून चालवण्यात येत होत्या. तसेच एक्स्प्रेसची वाहतूक ठप्प झाली.
अपघाताच्या चौकशीचे आदेश
गदग एक्स्प्रेस आणि पदुचरी एक्स्प्रेस या गाड्या एकाच ट्रॅकवर शुक्रवारी, १५ एप्रिल रोजी, रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास आल्या. मुंबई – ट्रेन क्रमांक 11005 दादर ते पुद्दुचरी या एक्सप्रेसचे मागील ३ डबे रुळावरून घसरले. ९.४५ वाजता माटुंगा स्थानकाजवळ हा अपघात झाला. घटनास्थळी अभियांत्रिकी पथक दाखल झाले आहे. या अपघाताची चौकशी करण्याचा आदेश केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत.
Join Our WhatsApp Community