गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगभरात कोरोनाची लाट होती. वैद्यकीय क्षेत्रावर ताण असल्यामुळे कोरोनाच्या काळात राज्यात नॉनकोविड रुग्णांना उपचार देण्यास काही प्रमाणात विलंब झाला होता. आता कोरोनाचा उद्रेक रोखण्यात यश आल्यानंतर नॉनकोविड रुग्णांवर वेळीच शस्त्रक्रिया करण्यात येत असून, यामुळे रक्ताची मागणी वाढली आहे.
( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर मेगाब्लॉक; परशुराम घाट रोज ५ तास राहणार बंद )
नॉनकोविड रुग्णांच्या उपचारांमध्ये वाढ
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे राज्य निर्बंधमुक्त झाले असून नॉनकोविड रुग्णांच्या उपचारांमध्ये वाढ झाली आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून सर्वांनी पुढाकार घेत रक्तदान करावे असे आवाहन आरोग्य विभागामार्फत केले जात आहे. सध्या राज्यात ४९ हजार ४९५ तर मुंबईत ७ हजार १२ रक्त पिशव्या ( युनिट) उपलब्ध आहे. रक्ताची मागणी वाढत असून केवळ १५ दिवसांचा रक्तसाठाच राज्यात शिल्लक आहे.
रक्तदानाचे फायदे
- वजन नियंत्रणात राहते
- हृदयाचे आरोग्यही सुधारण्यास मदत
- लाल पेशी तयार होतात
- कर्करोगाचा धोका कमी