मनसे अध्यक्ष यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मशिदींवरील भोंगे काढले नाहीत तर हनुमान चालीसा पठण केले जाईल असा इशाराही राज ठाकरेंनी दिला होता. आता याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालीसा पठण करण्याचं आवाहन केले आणि पठण न केल्यास मातोश्री बाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याचा थेट इशारा दिला आहे.
राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न
यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी मातोश्री बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. यावेळी राणा दाम्पत्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. मातोश्री हे आमचे श्रद्धास्थान असून असे आवाहन जर कोणी देण्याचा प्रयत्न केला तर सहन केले जाणार नाही असे शिवसैनिकांनी सांगितले आहे. यावेळी शिवसेनेचे नेते व राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब देखील उपस्थित होते. धार्मिक तेढ निर्माण करून काही जणांकडून राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, आता जनताच या लोकांना उत्तर देईल असे ते म्हणाले.
( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर मेगाब्लॉक; परशुराम घाट रोज ५ तास राहणार बंद )
अमरावतीच्या खंडेलवाल नगरमधील पगडीवाले हनुमान मंदिर याठिकाणी राणा दाम्प्याकडून हनुमान चालीसा पठण सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी रात्री अमरावतीमध्ये शिवसैनिकांनी राणा यांच्या निवासस्थानासमोर जोरदार आंदोलन केलं.
Join Our WhatsApp Community