पंतप्रधानांच्या हस्ते हनुमंताच्या 108 फूट मूर्तीचे उद्घाटन

115

हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील मोरबी येथील भगवान हनुमानच्या 108 फूट उंच मूर्तीचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी जनतेला हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर मेगाब्लॉक; परशुराम घाट रोज ५ तास राहणार बंद )

चार धाम प्रकल्प

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, हनुमानजी चार धाम प्रकल्पांतर्गत देशभरात चार दिशांना स्थापित करण्यात येणाऱ्या चार मूर्तींपैकी मोरबी येथील ही दुसरी मूर्ती आहे. देशाच्या पश्चिमेकडील मोरबी येथील परमपूज्य बापू केशवानंद यांच्या आश्रमात ही मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.  ‘हनुमानजी चार धाम प्रकल्प मालिकेतील पहिली मूर्ती 2010 मध्ये उत्तरेकडील हिमाचल प्रदेशातील शिमला येथे स्थापित करण्यात आली होती, तर दक्षिणेकडील रामेश्वरममध्ये तिसऱ्या पुतळ्याचे काम सुरू झाले आहे. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.