पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्गिकेचा स्वारगेटपासून पुढे कात्रजपर्यंत विस्तार करण्यास महापालिकेच्या मुख्य सभेने मंजुरी दिली अूसन स्वारगेट-कात्रज हा विस्तारित मार्ग भुयारी असेल, पालिकेने मान्य केलेला प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
मेट्रो मार्गिकेच्या प्रस्तावास लवकरच मान्यता
प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येणार आहे. याबाबत नगरविकास विभागाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना केल्या असल्याने स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मेट्रो मार्गिकेच्या प्रस्तावास लवकरच मान्यता मिळणार आहे.
( हेही वाचा : मुंबई-गोवा महामार्गावर मेगाब्लॉक; परशुराम घाट रोज ५ तास राहणार बंद )
मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेचा विस्तार कात्रजपर्यंत करण्याची मागणी स्थानिक नगरसेवक (माजी) केली होती. त्यानुसार महापालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला (महामेट्रो) या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची सचूना केली होती. यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकात 60 लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. महामेट्रोकडून उन्नत आणि भुयारी अशा दोन मार्गिकांचा अहवाल आणि आर्थिक आराखडा करण्यात आला होता. त्यानुसार सदर मेट्रो मार्गिकेचा प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community