पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी केल्या या दोन मोठ्या घोषणा !

164

राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांवरुन केलेल्या वक्तव्यानंतर आता पुण्यात पत्रकार परिषद घेऊन, पुन्हा एकदा भोंग्यांवरुन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  भोंग्याचा विषय हा धार्मिक नसून, सामाजिक विषय आहे. भोग्यांचा त्रास हा फक्त हिंदूंनाच नाही, तर मुस्लिमांनाही होतो. असे राज ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच त्यांनी दोन मोठ्या घोषणाही केल्या आहेत.

हिंदू बांधवांनो सज्ज व्हा!

काही  मुस्लिम पत्रकार आहेत ते आता बााळा नांदगावकरांना भेटणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. मी देशातील तमाम हिंदू बांधवांना विनंती करतो की त्यांनी तयारीत रहावे. 3 तारखेपर्यंत मशिदींवरील भोंगे खाली उतरले नाहीत, तर त्यांना त्यांच्या शब्दात उत्तर दिले जाणार. देशापेक्षा जर का मुसलमानांना आपला धर्म मोठा वाटत असेल, तर मग आम्ही गप्प बसणार नाही. दिवसभरात 5 वेळा अजान वाजते. त्या त्या वेळेला हनुमान चालिसाही वाजणारच. असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.  मशिदींवरील भोंगे हा अनेक वर्ष असाच राहिलेला विषय आहे. त्यामुळे आता याकडे गांभिर्याने लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आम्हाला शांतता भंग करायची नाही. त्यांच्या प्रार्थनेला आमचा विरोध नाही. त्यांनी आपली प्रार्थना खुशाल करावी. पण आम्हाला त्रास देऊ नये.

( हेही वाचा: रामनवमी आणि हनुमान जयंतीला झालेले हल्ले नियोजित… यावर पंतप्रधान गप्प का? राऊतांचा सवाल )

आमचे हात बांधलेले आहेत काय?

आमच्या मिरवणुकांवर हल्ला होतो. मग आमच्या हातातही दगड येणारच. आमचे हात काही बांधलेले आहेत का? असा संतप्त सवालही राज ठाकरे यांनी यावेळी केला आहे. सोबतच राज ठाकरे यांनी यावेळी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

राज ठाकरेंच्या घोषणा ..

  • महाराष्ट्र दिनी संभाजी नगर येथे जाहीर सभा घेणार.
  • 5 जून ला मी माझ्या सर्व सहका-्यांसह अयोध्येला जाणार.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.