राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केल्यापासून राज्यात मनसे विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष सुरु आहे. ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरेंनी पुरंदरेंवर केलेल्या आरोपावरुनही वक्तव्य केले. त्यानंतर राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये संघर्ष सुरु झाला. शरद पवारांनी केलेल्या आरोपानंतर स्वत: लेखक जेम्स लेनने या वादावर भाष्य केले आहे. इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांनी जेम्स लेनची ई- मेलद्वारे मुलाखत घेतली आहे.
जेम्स लेन काय म्हणाले
माझे पुस्तक हे प्रचलित असलेल्या कथांबद्दल आहे. मला कोणीही माहिती पुरवलेली नाही. काही लोक रामदास यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात, तर काही जण तुकाराम महाराजांना. माझ्या पुस्तकात मी कुठलेही ऐतिहासिक तथ्य मांडल्याचा दावा केलेला नाही. तसेच, मी कधीही बाबासाहेब पुरंदरेंशी एका शब्दानेही बोललेलो नाही, असे जेम्स लेन स्पष्ट केले आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे
ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत राज ठाकरेंनी राष्ट्रवादीला टार्गेट करत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. बाबासाहेब पुरंदरे साॅफ्ट टार्गेट आहेत. त्यांनी चुकीचा इतिहास सांगितला म्हणे. पण कोणत्या पानावर सांगितला ते तर सांगा. यांचे इतिहासकार कोण तर कोकाटे. महाराजांवर आजपर्यंत रणजित देसाईंनी लिहिले, संभाजी महाराजांवर बाबासाहेबांनी, मेहेंदळेंनी लिहिले. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने शिवाजी महाराज लोकांपर्यंत आणले. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसाने लिहिले आहे ते बघायचे आहे. आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना, त्यात फोड करणार की पेशव्यांनी केलेली गोष्ट वगैरे. शरद पवार साहेब, काय चालले आहे . राजयकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी सुरु असल्याचे, आरोप राज ठाकरेंनी केला होता.
( हेही वाचा: लोडशेंडींगबाबत ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची महत्त्वाची माहिती, म्हणाले…)
Join Our WhatsApp Community