एसी लोकल आता लवकरच नवीन रुपात पाहायला मिळणार आहेत. या नवीन एसी लोकलमध्ये सुधारित आसन व्यवस्था असणार आहे. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्प एमयूटीपी 3 अंतर्गत 238 लोकल गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल धावत आहेत.
अतिरिक्त डब्बे जोडले जाणार
नवीन एसी गाड्यांमध्ये मेट्रोसारखी अत्याधुनिक आसनव्यवस्था असणारे डब्बे असतील. तसेच आधीच्या गाड्यांच्या तुलनेत ट्रेनमध्ये प्रवाशांसाठी अधिक जागा देखील असेल. एक मोटर कोच, सध्याचे सहा डबे आणि सामानासाठीच्या अतिरिक्त डब्बे एकमेकांना जोडले जातील.
( हेही वाचा: खुशखबर! TATA ने सुुरु केली पगारवाढ )
2024 च्या अखेरीस धावण्याची शक्यता
गाडी चालवण्यासाठीची यंत्रणा या एसी लोकलच्या छतावर किंवा गाडीच्या डब्ब्यांच्या खाली बसवली जाईल. गाडी बसवताना त्यामध्ये एअर सस्पेन्शन सीस्टिमचाही वापर करण्यात येणार आहे. एसी लोकलची रचना आणि इतर आवश्यक बाबी निश्चित करण्यात आल्या आहेत. पहिला टप्प्यात 2024च्या अखेरीस या गाड्या धावण्याची शक्यता आहे, असे एमआरव्हीसीच्या अधिका-यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community