खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत रविवारी सकाळी आग लागली. त्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. लोटे येथील प्रिव्ही ऑरगॅनिकल कंपनीच्या गोदामाला ही आग लागली असून, एका पाठोपाठ एक झालेल्या स्फोटांमुळे परिसर हादरला आहे. आगीत कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षांत या औद्योगिक वसाहतीत अनेक कारखान्यांतून आग लागून काही कामगारांना प्राण गमवावे लागले, तर काही जण जायबंदी झाले आहेत.
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
आजच्या दुर्घटनेमुळे लोटे पंचक्रोशीतील नागरिक भयभीत झाले आहेत. आगीत कंपनीची लाखो रुपयांची हानी झाली आहे. आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकले नसले तरी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
( हेही वाचा: एक्स्प्रेसचा अपघात; लोकल सेवेला फटका, विद्यार्थी मुकले परीक्षेला )
घटनास्थळी दाखल
आग लागल्याचे समजताच मदत ग्रुप खेडचे अध्यक्ष प्रसाद गांधी, भाऊसाहेब खुडे, चेतन वाराणकर, तेजस मोरे, अक्षय भोसले, सुदर्शन कदम आदींचे पथक घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.
Join Our WhatsApp Community