देशात इंधनाबरोबरच दैनंदिन जीवनावश्यक गोष्टींचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. अशात तामिळनाडूतील एका लग्नात काही दिवसांपूर्वी नवरदेवाच्या मित्रांनी जोडप्याला लग्नाचे गिफ्ट म्हणून चक्क इंधन गिफ्ट केले होते. मात्र आता त्यापुढे जात आता गुजरातच्या राजकोट येथील एका लग्नात मित्रांनी नवरदेवाला भेट म्हणून चक्क लिंबू दिली.
अत्यावश्यक किंमतीतही होतेय सातत्याने वाढ
राजकोटच्या धोराजी शहरातील नुकत्याच पार पडलेल्या एका लग्नसमारंभात पाहुण्यांनी नवरदेवाला चक्क किलोभर लिंबू भेट म्हणून दिली. याविषयी प्रतिक्रिया देताना नवरदेवाचे मित्र दिनेश म्हणाले की, सध्या राज्यात आणि देशात लिंबांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यातच, उन्हाळा असल्याने लिंबांची मागणी आणि गरज मोठी आहे. त्यामुळे आम्ही नवरदेवास लिंबू भेट दिली. देशात दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे. त्यापाठोपाठ दुध, भाजीपाला आणि अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीतही वाढ होत आहे.
( हेही वाचा: संपकरी एसटी कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या जयश्री पाटील गेल्या कुणीकडे? )
याआधीही देण्यात आलेत अतरंगी गिफ्ट
तामिळनाडूतील एका लग्नात काही दिवसांपूर्वी नवरदेवाच्या मित्रांनी जोडप्याला लग्नाचे गिफ्ट म्हणून चक्क पेट्रोल आणि डिझेल गिफ्ट केले होते. तामिळनाडूतील ग्रेस कुमार आणि किर्तना यांनी नुकतीच लग्नगाठ बांधली. लग्नाला जाताना पाहुणे विविध प्रकारच्या भेटवस्तू घेऊन जातात. मात्र येथील मित्रमंडळींनी आपल्या मित्राला नव्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी १ लिटर पेट्रोल आणि १ लिटर डिझेल दिले होते.
Join Our WhatsApp Community