बँकांचे वेळापत्रक बदलले

137

कोरोनामुळे बँकांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला होता. बँकांचे वेळापत्रक बदलले होते, मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला आहे. त्यामुळे बँकांचे वेळापत्रकही पूर्ववत करण्यात आले आहे. सोमवारी, १८ एप्रिलपासून बँका पुन्हा सकाळी ९ वाजल्यापासून सुरु होणार आहेत.

शेअर बाजारदेखील ९ वाजता उघडणार 

बँका पुन्हा पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे सुरु होणार असल्याने ग्राहकांची मोठी सोय होणार आहे. आणखी एक तास अधिक बँका उघड्या राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने १८ एप्रिल २०२२ पासून बँका उघडण्याच्या वेळेत बदल केला आहे. यापुढे बँका ९ वाजता उघडणार आहेत. कोरोना महामारीमुळे रिझर्व्ह बँकेने बँकांची उघडण्याची वेळ कमी केली होती. आता पुन्हा ही वेळ नियमित केली जात आहे. आरबीआयद्वारे संचलित मार्केटच्या ट्रेडिंगच्या वेळा देखील बदलल्या आहेत. यामध्ये कॉल मनी, गवर्मेंट पेपर्स, गवर्मेंट सिक्योरिटीज, रेपो इन कॉर्पोरेट बॉन्ड्स व रूपी इंटरस्ट रेट डेरिवेटिव या बाजारांचा समावेश आहे. याशिवाय शेअर बाजार देखील १० ऐवजी सकाळी ९ वाजता उघडणार आहेत.

(हेही वाचा मुस्लिम कार्यकर्त्यांकडून राज यांच्या भोंग्यांवरील भूमिकेचे समर्थन)

कार्डलेस व्यवहारांना प्रोत्साहन

आरबीआयने सर्व बँकांना कार्डलेस एटीएम व्यवहाराची सुविधा लवकरच सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्राहकांना लवकरच युपीआय द्वारे बँक आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा मिळणार आहे. कार्डलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी आरबीआय हे पाऊल उचलत आहे. यासाठी सर्व बँका आणि त्यांच्या एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा युपीआय  द्वारे दिली जाईल. कार्डलेस कॅश ट्रान्झॅक्शनमध्ये एटीएम पिनऐवजी मोबाइल पिन वापरला जाईल, ज्यामुळे एटीएमद्वारे होणारी फसवणूक रोखण्यास मदत होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.