कमाल तापमानाच्या जागतिक नोंदीत पहिल्या पंधरामध्ये ‘ही’ १० शहरे भारतातील

124

जगभरातील कमाल तापमानाच्या पहिल्या पंधरा शहरांच्या यादीत भारतातील दहा शहरांचा समावेश रविवारी झाला. ही विक्रमी नोंद चाळीस अंश पार गेलेल्या देशातील राजस्थान, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश या राज्यातील शहरांची झाली. राजस्थानातील बिकानेर जगभरातून पाचव्या स्थानावर सर्वात जास्त उष्ण शहर म्हणून रविवारी घोषित झाले. बिकानेर येथे कमाल तापमान ४४.२ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. राज्यातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर आणि अकोला ही तीन शहरे जागतिक क्रमवारील पहिल्या पंधरा स्थानांत पोहोचली.

पहिल्या चारमध्ये पाकिस्तान आणि लिबिया

पाकिस्तान देशातील ४५ अंश सेल्सिअसची नोंद झालेल्या नवाबशाह आणि पड इदान या शहरांची नावे पहिल्या दोन स्थानांवर नोंदवली गेली. तिस-या स्थानावर पाकिस्तानातील जकोबाबाद शहराचे कमाल तापमान नोंदवले गेले. जकोबाबाद येथे ४४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. लिबिया देशातील जलो शहराला ४४.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाच्या नोंदीत चौथे स्थान मिळाले.

वायव्य पाकिस्तान ते मध्य भारतापर्यंत सूर्याचा प्रकोप

रविवारी पाकिस्तानातील वायव्य भागांतील बारा शहरांमध्ये कमाल तापमान ४० ते ४५ अंशादरम्यान नोंदवले गेले. हा प्रभाव देशातही आढळून आला. पाकिस्तानलगतच्या राजस्थान, गुजरातमध्येही पा-याने चाळीशी पार केली होती. राजस्थान राज्यातील बिकानेर येथे रविवारी देशभरातील सर्वात जास्त कमाल तापमान नोंदवले गेले. बिकानेरमध्ये ४४.२ कमाल तापमान नोंदवल्याचे भारतीय वेधशाळेने जाहीर केले. परिणामी, जागतिक नोंदीतही भारताच्या बिकानेर शहराला पाचवे स्थान मिळाले.

(हेही वाचा फळांचे रस, शीतपेयांच्या किमती ऐकून मुंबईकरांना फुटला घाम)

उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशासह, बिहार, छत्तीसगडसह राज्यातील विदर्भ आणि मध्यमहाराष्ट्रापर्यंत कमाल तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत आढळले. देशातील मध्य भारतात आणि ईशान्य भागात अजून दोन दिवस कमाल तापमान चार अंशाने जास्त दिसून येईल, असा अंदाज भारतीय वेधशाळेने जाहीर केला आहे.

रविवारच्या जागतिक कमाल तापमानात भारतातील शहरे, त्यांचे स्थान

  • राजस्थानातील बिकानेर शहराताला पाचवे स्थान मिळाले. बिकानेर येथे ४४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले.
  • राज्यातील विदर्भातील सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्रपुरी येथे नोंदवले गेले. ब्रह्मपुरी येथे कमाल तापमान ४४.२ अंश नोंदवले गेले. ब्रह्मपुरीला जागतिक क्रमवारीत सहावे स्थान मिळाले.
  • ब्रह्मुपुरीसह विदर्भातील चंद्रपूराचेही कमाल तापमान ४४.२ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेले. दोन्ही शहरे राज्यातील सर्वात जास्त कमाल तापमानाच्या यादीत पहिल्या स्थानावर होती. मात्र जागतिक क्रमवारीत ब्रह्रमपुरीखालोखाल चंद्रपूर शहराला सातवे स्थान मिळाले.
  • जागतिक क्रमवारीत उत्तर प्रदेशातील झाशी हे शहर आठव्या स्थानावर होते. झाशी येथील कमाल तापमान ४४.१ अंश सेल्सिअस होते.
  • झाशीनंतरही राजस्थान राज्यातील बारनेर येथील ४३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाच्या नोंदीला जागतिक क्रमवारीत नववे स्थान मिळाले.
  • दहाव्या स्थानावर राजस्थानातील चुरु शहराला स्थान मिळाले. ४३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाच्या नोंदीसह चुरु शहराला जागतिक क्रमवारील दहावे स्थान मिळाले.
  • झारखंड येथील गलतोंजगज या शहरातही ४३.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. हे शहर जागतिक क्रमवारील अकराव्या स्थानावर होते.
  • मध्यप्रदेशातील खजुराहो ४३.८ अंश सेल्सिअस तापमानााच्या नोंदीमुळे बाराव्या स्थानावर जागतिक क्रमवारीत नोंदवले गेले.
  • राजस्थानातील पिलानी शहराला चौदावे स्थान मिळाले. ४३.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान पिलानी येथे नोंदवले गेले.
  • राज्यातील विदर्भात अकोला येथील ४३.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान जागतिक क्रमवारीत पंधरावे स्थान मिळाले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.