एसटी संप आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. सध्या त्यांचा मुक्काम सातारा जेलमध्ये आहे. अशातच त्यांच्यामागे आणखी एक संकट लागणार आहे. त्यात त्यांची मुलगी झेन हिचा सहभाग आहे.
झेन ठाणे ते दादर हायवेवर गाडी चालवत होती
सदावर्ते यांची मुलगी झेन ही गाडी चालवत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गुणरत्न सदावर्ते पॅसेंजर सीटवर बसले आहेत. तिचे वय सध्या १४-१५ वर्षांच्या आसपास आहे. गुणरत्न सदावर्ते हे मुलीचा कार चालवितानाचा व्हिडीओ काढत आहेत. या व्हिडीओमध्ये सदावर्ते म्हणत आहेत की, माझी मुलगी झेन ठाणे ते दादर हायवेवर पहिल्यांदाच फॉर्च्युनर ही गाडी चालवत आहे. यानंतर ते गाडीचा नंबर काय आहे हे सांगत आहेत. यावर बारामतीच्या एका व्यक्तीने व्हिडीओ पोस्ट करत महाराष्ट्र, ठाणे पोलिसांसह गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनाही टॅग केले आहे. आपल्या अल्पवयीन १२ वर्षांच्या मुलीला लायसन्स नसतानाही हायवेवर गाडी चालवण्यास देऊन इतरांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते व गाडीमालक जयश्री पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
Join Our WhatsApp Community