सहा महिन्यांपासून गुणरत्न सदावर्तेंच्या घरी बैठका, पोलीस तपास सुरू

168

एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी सध्या अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात राज्यभरात ठिकठिकाणी गुन्हे दाखल होत आहेत. सध्या त्यांचा मुक्काम सातारा जेलमध्ये आहे. अशातच एक माहिती समोर आल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. सिल्व्हर ओक येथे झालेल्या हल्ला प्रकरणात अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर लोअर परळ येथील घराच्या गच्चीवर गेल्या ६ महिन्यांपासून बैठका सुरू होत्या असे सांगितले जात आहे.

सदावर्तेंसह आतापर्यंत ११६ आरोपींना अटक

या माहितीवरून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. या बैठका कशासाठी घेतल्या जात होत्या, यामध्ये बैठकांना नियमित उपस्थित राहणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. शरद पवारांच्या बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी दगड आणि चपलाफेक करीत हल्ला चढविला होता. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गावदेवी पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांच्यासह आतापर्यंत ११६ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी अजित मगरे नावाच्या आरोपीला अटक केली. मगरे याचा हल्ल्याच्या कटात महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांकडून अधिक तपास सुरू

यासह पोलिसांनी असेही सांगितले की, अटकेत असलेला संदीप गोडबोले हा खास हल्ल्यासाठी नागपूरहून मुंबईत आला होता. तो सदावर्ते यांच्या निवासस्थानी ७ एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यापूर्वीच्या बैठकीत उपस्थित होता. त्याचा या गुन्ह्यात महत्त्वाचा सहभाग होता, तसेच त्याच्यासोबत अन्य काही व्यक्तीसह आरोपी जयश्री पाटील देखील हजर होत्या. गोडबोले याच्याकडून मोबाइल जप्त करणे बाकी आहे. त्याचा अधिक तपास करण्यासाठी नागपूर येथे नेण्याची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार, दोघांना कोठडी मिळाल्यानंतर पोलीस अधिक तपास करत आहे.

(हेही वाचा – आता लवकरच एसी लोकल दिसणार नव्या रुपात!)

बैठकांना नियमित हजेरी लावणाऱ्यांचा शोध सुरू

दरम्यान, पोलिसांच्या हाती लागलेल्या माहितीनुसार, गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून सदावर्ते यांच्या घराच्या गच्चीवर बैठका सुरू होत्या. सीसीटीव्हीच्या मदतीने बैठकांना नियमित हजेरी लावणाऱ्यांचा शोध सुरू आहे, तसेच यामागे आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.