उष्ण हवामानातही टिकणार भारतीय लस; चाचणी यशस्वी

133

बंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) आणि जैवतंत्रज्ञान कंपनी मायनव्हॅक्स यांनी कोरोना विषाणूच्या काटेरी कवचाच्या ‘रिसेप्टर बाईंडिग डोमेन’ (आरबीडी) या प्रथिनांच्या काही भागाचा ही लस निर्माण करण्यासाठी उपयोग केला आहे. कोरोनावर प्रभावी ठरु शकणा-या भारतीय लशीची उंदरांवरील चाचणी यशस्वी झाली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ही लस साठवण्यासाठी थंड हवामानाचीही गरज नाही.

प्रभावी लस

या लशीची चाचणी करणाऱ्या पथकात ऑस्ट्रेलियाच्या कॉमनवेल्थ सायंटिफिक अ‍ॅंड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या संशोधकांचा समावेश आहे. त्यांनी या लशीविषयीचे असे निरीक्षण नोंदवले, की ही लस ३७ अंश सेल्सियस तापमानात चार आठवडे म्हणजे सुमारे महिनाभर टिकते. १०० अंश तापमानतही ही लस सुमारे ९० मिनिटे प्रभावी राहते.

( हेही वाचा: आता कारवाईचा वाजणार भोंगा! परवानगी न घेतल्यास 3 मे नंतर थेट कारवाई )

उंदरांवर केलेले प्रयोग यशस्वी

वायरसलेज या विज्ञानविषयक नियतकालिकात या लशीबाबत माहिती देण्यात आली आहे. उंदरांवर केलेले प्रयोग यशस्वी ठरले आहेत. या दरम्यान, ही लस डेल्टा आणि ओमिक्राॅन या प्रकारांवरही प्रभावी असल्याचे, दिसून आले आहे. ही लस उंदराला दिल्यानंतर, उंदरात रोगप्रतिबंधक क्षमता निर्माण झाली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.