मुंबईत मेट्रो सेवा विस्कळीत

117

मुंबईतील घाटकोपर -वर्सोवा मार्गावरील मेट्रो विस्कळीत झाली. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या  सुमारास मेट्रोसमोर एका तरुणाने उडी घेतल्याने सोमवारी मेट्रो प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. सुमारे दोन तास मेट्रोचा खोळंबा झाला होता.

तरुणाचा मृत्यू

साकीनाका स्थानकात प्रवेश करत असलेल्या वर्सोवा- घाटकोपर गाडीसमोर एका तरुणाने उडी घेतली. त्यात या तरुणाचा मृत्यू झाला आहे. अकस्मात घडलेल्या घटनेनंतर, मेट्रो व्यवस्थापनाने तातडीने गाडी रिकामी केली आणि एका मार्गावरील वाहतूक थांबवली. त्यामुळे मेट्रोचे वेळापत्रक कोलमडले.

( हेही वाचा :‘पीएफआय’ चा मुंब्रा अध्यक्ष अब्दुल मतीन फरार )

मेट्रो पुन्हा सुरळीत

सध्या आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह ताब्यात घेतला असून, पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्या करणा-या तरुणाची ओळख पटलेली नाही. आत्महत्या केलेल्या तरुणाचे वय 25च्या आसपास असल्याचे बोलले जात आहे. दोन तासांच्या  झालेल्या खोळंब्यानंतर, आता मेट्रो पुन्हा पुर्वपदावर आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.