बदलत्या काळानुसार टीव्हीचा आकार, स्वरूप बदलत चालले आहे. अलिकडे प्रत्येकजण स्मार्ट टीव्ही खरेदीला प्राधान्य देत आहेत. स्मार्ट टीव्हीला सहज इंटरनेट, आधुनिक अॅप्स कनेक्ट करता येतात. Youtube, Hotstar, Amazon prime, Netflix सारखे अॅप्स टीव्हीला कनेक्ट करून विविध सीरिजचा आनंद घेणे हा प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक झाला आहे. परंतु आजही अनेक लोकांकडे जुन्या काळातील साधे बॉक्स टीव्ही आहेत. या टीव्हींना स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्ट होत नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमच्या जुन्या टीव्हीला सहज स्मार्ट टीव्हीमध्ये कन्व्हर्ट करून आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला थोडे पैसे खर्च करावे लागणार आहेत.
( हेही वाचा : फळांचे रस, शीतपेयांच्या किमती ऐकून मुंबईकरांना फुटला घाम )
अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक
अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक (Amazon Fire TV Stick) ची किंमत ३ हजार ९९९ रुपये असून यासोबत तुम्हाला अॅलेक्सा वॉईस रिमोट मिळतो. ही स्टिक तुम्ही पोर्टद्वारे तुमच्या जुन्या टीव्हीला कनेक्ट करू शकता.
Xiaomi Mi बॉक्स 4K
या बॉक्सची किंमत ३ हजार ४९९ रुपये असून याचा वापर करून तुम्ही तुमच्या जुन्या टीव्हीला स्मार्ट बनवू शकता. या डिव्हाइसमुळे तुम्ही जुन्या टीव्हीला आधुनिक अॅप्स कनेक्ट करू शकता.
Tata Sky Binge + अँड्रॉइड सेटटॉप बॉक्स
Tata Sky Binge + अँड्रॉइड सेटटॉप बॉक्सची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. हा सेटटॉप बॉक्स कनेक्ट केल्यामुळे युजर्सला गुगल प्ले स्टोअर विविध अॅप्सचा अॅक्सेस मिळेल.
ACT Stream TV 4K
ACT Stream TV 4K हा अँड्रॉइड टीव्ही बॉक्स असून याची किंमत ४ हजार ४९९ रुपये आहे. यामुळे टीव्हीला लोकप्रिय अॅप्सचा सपोर्ट मिळेल.
Airtel Xstream Box
Airtel Xstream Box हा डिव्हाइस तुम्ही तुमच्या जुन्या टीव्हीला कनेक्ट करू शकता याची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे.
डिश स्मार्ट हब अँड्रॉइड एचडी सेटटॉप बॉक्स(Dish SMRT Hub Android HD Set Top Box)
या बॉक्सची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे.
Join Our WhatsApp Community