महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली आहे. त्याकरता ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे देशातील अन्य राज्यांत हनुमान चालीसा लावला जात आहे. राज ठाकरे यांची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तुलना होऊ लागली आहे. मात्र भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राज ठाकरे यांची तुलना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी करण्यास तयार नाहीत.
काय म्हणाले नारायण राणे?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची तुलना कोणाशीही करु इच्छित नाही. साहेब म्हणजे हिंदुत्वाचा पेटता निखारा होता. त्यांनी कधीच तडजोडी केल्या नाहीत, सौदेबाजी केली नाही. सत्तेसाठी किंवा पैशासाठी हिंदुत्वाशी गद्दारीचा विचारही डोक्यात आला नाही. आतासारखे नाही… एक मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्ववादी पक्षाला सोडले. बाळासाहेबांनी कधीही विचार केला नव्हता, असे नारायण राणे म्हणाले.
(हेही वाचा जयश्री पाटलांनी मारली थोबडीत! व्हिडीओ व्हायरल
तिन्ही पक्षांशी लढण्यास भाजप समर्थ
मनसे आणि भाजपाची ताकद एकत्र आली तर ताकद वाढेल. पण भाजपा एकटी तिन्ही पक्षांना सामोरे जाण्यासाठी समर्थ आहे, राज ठाकरेंच्या हिंदुत्वावर शंका येईल असे काही नाही, राज ठाकरे कायदेशीर बोलले असून राज्य सरकारला पावले उचलावी लागतील. कायद्याचे राज्य आहे असे दाखवण्यासाठी अधिकारी दोन-तीन ठिकाणी कारवाई करतील. पण भोंगे काढल्यानंतर जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ती परिस्थिती हाताळण्याची क्षमता महाराष्ट्र पोलिसांमध्ये नाही, असे नारायण राणे म्हणाले.
Join Our WhatsApp Community