बेस्ट बस मुंबईकर प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध करून देत असते. नेहमी विविध प्रकारच्या सुविधा पुरविणाऱ्या बेस्ट उपक्रमाकडून यावेळी देखील एका नव्या सुविधेचा लाभ प्रवाशांना मिळणार आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ बसमध्ये कंडक्टरशिवाय मिळणार तिकीट! )
‘टॅप इन टॅप आऊट’
१०० टक्के डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित असलेली ‘टॅप इन टॅप आऊट’ सेवा भारतामध्ये सर्वप्रथम बेस्ट उपक्रमाद्वारे उपलब्ध करण्यात येणार आहे. बेस्ट चलो स्मार्ट कार्ड तसेच चलो मोबाइल अॅपद्वारे प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या आधुनिक सेवेमुळे बस प्रवाशांना सुट्ट्या पैशांच्या कटकटीपासून कायमचा दिलासा मिळणार आहे.
बसेसमध्ये रीडर मशिन्स बसवण्यात आल्या आहेत. या मशिनवर कार्ड टॅप करून प्रवासी तिकीट काढू शकतात. टॅप केल्यावर प्रवाशांना लगेचच तिकीट उपलब्ध होईल. “प्रवाशांना बसच्या प्रवेशद्वाराजवळ बसवण्यात आलेल्या कार्ड रीडरवर टॅप करावे लागेल. रिंग रूट्स कॉरिडॉरवर ही सिस्टम सुरू होणार आहे” असे बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
Demo of Entry into a 100% Digital bus. pic.twitter.com/14VIjwPilx
— BEST Bus Transport (@myBESTBus) April 19, 2022
बेस्ट उपक्रमाचे आवाहन
सर्व प्रवाशांनी या आधुनिक अशा १०० टक्के डिजिटल सेवेचा उपयोग करून आपला प्रवास अधिकाधिक बेस्ट करावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमामार्फत करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community