रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील वर्ल्ड हेरिटेज बिल्डिंग येथे १७०व्या वर्धापनदिनानिमित्त, ‘आझादी का अमृत महोत्सव’ आणि जागतिक वारसा दिनानिमित्ताने रेल्वे सप्ताह आणि ‘नवरसंगम – एक गाथा सीएसएमटी की’ या अनोख्या लाइट आणि साउंड कम परफॉर्मन्स शोचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीतील ७० रेल्वे कलाकारांनी प्रकाश आणि संगीताच्या पार्श्वभूमीवर हा शो सादर केला. या शो मधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचे राष्ट्रीय चरित्र नाटयशास्त्राच्या विविध भावनांच्या माध्यमातून आपल्या समृद्ध इतिहासाचा कोलाज दर्शविण्याचा प्रयत्न केला.
( हेही वाचा : तिकीटासाठी ‘बेस्ट’चे बेस्ट पाऊल! )
समृद्ध इतिहासाचा कोलाज दर्शविण्याचा प्रयत्न
या कार्यक्रमात पद्म पुरस्कार विजेते, प्रख्यात कलाकार, वारसा संवर्धक आणि विविध क्षेत्रातील व्यक्ती, लष्कर आणि नौदलाचे वरिष्ठ अधिकारी, केंद्र आणि राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, वारसा आणि कलाप्रेमी, प्रसारमाध्यमे, युनियन प्रतिनिधी आणि इतर सर्व प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे याच्याशी जोडल्या गेलेल्या व्यक्ती, मध्य रेल्वे महिला कल्याण संस्थेच्या (CRWWO) अध्यक्षा मीनू लाहोटी आणि इतर सदस्यही यावेळी उपस्थित होते.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी यांचे स्वागत करताना, या शो मधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इमारतीचे राष्ट्रीय चरित्र नाटयशास्त्राच्या विविध भावनांच्या माध्यमातून आपल्या समृद्ध इतिहासाचा कोलाज दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले. या भव्य वारसा वास्तूच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमात संगीत, नृत्य, नाट्य, कविता आणि गायन यांचे व्हायब्रंट रंग सादर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. एस.के. पंकज, वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक आणि अध्यक्ष, मध्य रेल्वे सांस्कृतिक अकादमी यांनी आभार मानले.
Join Our WhatsApp Community