शीख गुरु तेग बहादूर यांच्या ४००व्या प्रकाश पर्वानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. केंद्र सरकार यानिमित्ताने एक विशेष नाणे आणि टपाल तिकीट जारी करणार आहे. या कार्यक्रमात कीर्तनाचा कार्यक्रमही होणार आहे.
कार्यक्रमासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली समिती
यासंदर्भात केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी माहिती दिली. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने सांस्कृतिक मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि देशातील आणि जगातील अनेक नामवंत व्यक्ती सहभागी होणार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या वर्षीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववे शीख गुरु तेग बहादूर यांच्या प्रकाश पर्वानिमित्त दिल्लीतील शिशगंज गुरुद्वाराला भेट दिली होती. नरेंद्र मोदींनी ट्विट करून म्हटले होते की, आज मी गुरुद्वारा शीशगंज साहिबमध्ये प्रार्थना केली. विशेष म्हणजे केंद्र सरकारने गुरु तेग बहादूर यांचे 400 वे प्रकाश पर्व थाटामाटात साजरे करण्याचा निर्णय आधीच घेतला होता. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीची बैठकही नुकतीच झाली.
Join Our WhatsApp Community