गणपत पाटील नगरला जो न्याय तोच न्याय अंधेरीतील जमिनीसाठी का नाही? भाजपचा सवाल

146

मुंबईकरांचे हे प्रश्न आम्ही विचारायचे नाहीत काय असा सवाल करत भाजप नेते व आमदार ऍड आशिष शेलार यांनी गणपत पाटील नगर मधील गरिब माणसाला घर देण्याचा विषय आला की, हा एनडी झोन आहे असे सांगितले जाते. तर अंधेरीतील मधू वखारिया यांची मोकळी जागा ज्यावर पण तिवर आहेत ती जागा आरक्षण बदलून मात्र अविनाश भोसले, विकी ओबेरॉय या बिल्डरांना दिली जाते. मेट्रो कारशेडचे काम झाडे तूटणार सांगत अडवले जाते, मात्र दुसरीकडे बिल्डरांना ३८ हजार झाडे तोडण्याची परवानगी दिली जाते अशा शब्दात शेलार यांनी दहिसर येथील पोलखोल सभेत समाचार घेतला.

( हेही वाचा : शिवसेनेची पोलखोल करत मुंबईत धावणार भाजपचा रथ )

शिवसेनेवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका

मुंबई भाजपातर्फे मुंबई पोल-खोल सभांचे आयोजन करण्यात आले असून या शृंखलेतील दुसरी सभा सोमवारी दहिसर येथील गणपत पाटील नगरमध्ये झाली. आमदार मनिषा चौधरी, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर यांच्यासह भाजपा नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. या सभेत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना आमदार ऍड आशिष शेलार यांनी महापालिकेच्या कारभाराचा पंचनामा करीत शिवसेनेवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

सत्ताधीशांनी मुंबईला मृत्यूचा सापळा केलाय

दरवर्षी सरासरी ४० हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मुंबई महापालिकेने गेल्या पाच वर्षांत २ लाख कोटी रुपये खर्च केले ते कुठे गेले? असा सवाल करत आशिष शेलार यांनी भाजपाच्या पोल-खोल सभेमध्ये सत्ताधीशांनी मुंबईला मृत्यूचा सापळा केलाय असा आरोप केला. मुंबईकरांसाठी महापालिका पाच वर्षात 2 लाख कोटी खर्च झाले. मग जागतिक किर्तीचे डाॅक्टर अमरापूरकर यांचा मॅनहोलमध्ये पडून मृत्यू कसा होतो? घाटकोपरची एक महिला चक्कीवर दळण टाकण्यासाठी निघते तीचा मृत्यू गटारात पडून कसा होतो? वरळीच्या सिलेंडर स्फोटातील कुटुंबाला पालिका रुग्णालयात चार तास उपचार का मिळाले नाहीत? पालिका रुग्णालयात औषध का मिळत नाहीत? असे प्रश्न विचारत २ लाख कोटी रुपये मग जातात कुठे? चोवीस तास पाणी देणार सांगितले, ६० हजार कोटी खर्च केले मग चोवीस तास पाणी मिळाले का? असा प्रश्न ही उपस्थितांना त्यांनी केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.