मागच्या पाच महिन्यांपासून एसटीच्या कर्मचा-यांचा संप सुरु असल्याने, एसटीच्या वाहतूकीवर खूप मोठा परिणाम झाला. आता न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर, तब्बल 15 हजार कर्मचारी एकाच दिवसात कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे एसटी आता सुरळीत चालू झाल्याची चित्र दिसत आहे.मंगळवारी एकूण 15 हजार एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले. कर्मचा-यांची उपस्थिती 61 हजार 647 झाली असून, 20 हजार कर्मचारी अद्यापही संपात सहभागी आहेत. दरम्यान, 11 हजार कर्मचा-यावर बडतर्फीची कारवाई केली आहे.
न्यायालयाचा आदेशानंतर कर्मचारी कामावर रुजू
लालपरी रस्त्यावर धावू लागल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय थांबली आहे. विशेषत: खेड्या पाड्यातील ग्रामीण भागातील लोकांसाठी खूप सोय झाली आहे. देशव्यापी लाॅकडाऊननंतर अनलाॅक काळात गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच, एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले. त्याने लालपरी जागेवर थांबून राहिली. मात्र आता न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर, अनेक कर्मचारी कामावर परतले आहेत.
( हेही वाचा: लालपरी धावू लागताच तिजोरीत जमा झाले इतके कोटी रुपये! )
राज्य सरकारने संपकाळात सहभागी असलेल्या कर्मचा-यांना वेतन न देण्याचा निर्णय घेतला आहे. रजेशिवाय तसेच, कोणतेही कारण न देता गैरहजर असलेल्या कालावधीसाठी वेतनावर दावा कोणालाही करता येणार नाही. या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी राज्य सरकारने केली आहे.