Manappuram Finance वर रिझर्व्ह बँकेची कारवाई, १७ ठोठावला लाखांचा दंड!

147

मणप्पुरम फायनान्स लिमिटेडला मोठा झटका बसला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI ने मणप्पुरम फायनान्सला काही नियमांचे पालन न केल्यामुळे तब्बल 17.6 लाखांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी (NBFC) मणप्पुरम फायनान्सला Know Your Customer (KYC) मार्गदर्शक तत्त्वांसह प्रीपेड पेमेंट उत्पादनांशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 17 लाख रुपयांचा दंड ठोठावल्याचे समोर आले आहे.

… म्हणून आरबीआयने ठोठावला दंड

मध्यवर्ती बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अॅक्ट, 2007 च्या कलम 30 मध्ये असलेल्या अधिकारांनुसार हा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच ही कारवाई नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आहे. कंपनीच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर मत व्यक्त करण्याचा हेतू नाही. प्रीपेड पेमेंट उत्पादने (PPIs) जारी करणे आणि ऑपरेट करण्याच्या सूचनांसह KYC नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कंपनीला दंड ठोठावण्यात आला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी रिझर्व्ह बँकेने कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. कंपनीचे उत्तर आणि सुनावणीची संधी दिल्यानंतर आरबीआय बँकेने हा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला.

(हेही वाचा -मनसेचं ठरलं! शिवतीर्थावरील राज ठाकरेंच्या बैठकीत मोठा निर्णय; काय म्हणाले नांदगावकर?)

Manappuram Finance बद्दल…

  • मणप्पुरम फायनान्स ही नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी असून ज्याच्या देशभरातील सुमारे 25 राज्यांमध्ये शाखा आहेत.
  • केरळमध्ये कंपनीचं मुख्यालय असलेल्या 1949 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीत 17,500 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
  • 2022 च्या सुरुवातीपासून या कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे 26.62 टक्के घसरण झाली आहे.
  • गेल्या एका वर्षात त्यात 13.28 टक्क्यांनी घट झाली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.