ऑफीसमधून थकून घरी आल्यावर जेवण बनवण्याचा कंटाळा आला आणि हाॅटेलमध्ये जेवायला जायचा बेत आखलात तर खिशात थोडे अधिक पैसे घेऊन बाहेर पडा, कारण सातत्याने होणा-या इंधन दरवाढीचा परिणाम आता हाॅटेल व्यवसायावरही झालेला पाहायला मिळत आहे. हाॅटेलमधील प्रत्येक पदार्थ 15 ते 20 टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. गॅसच्या किमतीत वाढ झाल्याने, आता जगायचे कसे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेपुढे निर्माण झाला आहे.
इंधन दरवाढीमुळे हाॅटेल व्यवसायावर संकट
या वाढणा-या महागाईला सामोरे जाण्यासाठी पदार्थांच्या किंमती वाढवल्या जाणार आहेत. या पदार्थांच्या किंमती एकाच वेळी वाढणार नसून, परिस्थितीचा अभ्यास करत या किंमतींमध्ये वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक पदार्थावर जवळ जवळ 15 ते 20 टक्के वाढवण्यात येणार आहेत. इंधन दरवाढीमुळे हाॅटेल व्यवसायापुढे मोठे संकट उभे राहिले आहे. आधी कोरोना संकट काळात दीड- पावणे दोन वर्षे हाॅटेल व्यवसाय ठप्प होता.
( हेही वाचा: इंधन दरवाढीच्या निषेधार्थ अशीही काढण्यात आली एक वरात! )
हाॅटेलसाठी लागणा-या प्रत्येक बाबींच्या किमती वाढल्या आहेत. महागाई अशीच वाढत राहिली तर हाॅटेलमधील पदार्थांचे दर वाढवावेच लागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे. (मन्नू गौडा सद्गुरू उपहारगृह)