आपलं स्वतःचं हक्काचं घर आणि गाडी असावी असे प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण त्या गाडीच्या किंमती पेक्षा तिच्या नंबर प्लेटची किंमत जास्त असेल तर… हो हे अतिश्योक्ती वाटत असलं तरी हे खरं आहे. आपल्या गाडीची नंबर प्लेट युनिक असावी आणि त्याची चर्चा व्हावी, असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी लाखो रुपये जास्त मोजायलाही अनेकजण तयार असतात. देशातील अनेक राज्य फॅन्सी नंबर प्लेटसाठी लिलावही करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, एका व्यक्तीने होंडा अॅक्टिव्हा गाडीच्या नंबर प्लेटसाठी तब्बल 15 लाख रुपये मोजले आहेत.
(हेही वाचा – SBI च्या तिजोरीतील चिल्लरवर डल्ला! तब्बल ११ कोटींची नाणी गायब, CBI चौकशी सुरू)
मिळालेल्या माहितीनुसार, चंदिगड नोंदणी आणि परवाना प्राधिकरणाने काही वाहनांच्या नंबर प्लेटचा लिलाव आयोजित केला होता. या लिलावात प्राधिकरणाला दीड कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. या लिलावादरम्यान 0001 क्रमांक देखील लिस्टेड होता. जो नंबर ब्रज मोहन नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या अॅक्टिव्हा गाडीसाठी खरेदी केला आहे. या लिलावादरम्यान ही नंबर प्लेट 15 लाख रुपयांना विकली गेली आहे. ब्रज मोहन यांच्याकडील अॅक्टिव्हाची किंमत 71 हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. एचटी आहोच्या रिपोर्टनुसार या गाडीचा नंबर आता CHO1-CJ-0001 असा असणार आहे.
हीच नंबर प्लेट वापरणार भविष्यातील कारसाठी?
ही महागडी नंबर प्लेट कायमस्वरूपी गाडीवर दिसणार नाही. या नंबर प्लेटचे खरेदीदार ब्रज मोहन यांनी सांगितले की ते आपल्या भविष्यातील कारसाठी ही नंबर प्लेट वापरणार आहेत. मोहन यानी एका लिलावादरम्यान ही फॅन्सी नंबर प्लेट खरेदी केली आहे. चंदीगड आणि परवाना प्राधिकरणाने नवीन वाहन सिरीज CHO1-CJ अंतर्गत काही फॅन्सी नंबर प्लेट्सचा नुकताच लिलाव केला. हा लिलाव 14 ते 16 एप्रिल दरम्यान पार पडला. या लिलावात प्राधिकरणाला दीड कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यादरम्यान 378 प्लेट्सची विक्री झाल्याची माहिती देखील समोर येत आहे.
Join Our WhatsApp Community