जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहर वाहतूक शाखा पोलिसांनी धुळे रोडवरील नाकाबंदीत आठ लाखांचा गांजा जप्त केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्कॉर्पीओमधून ५८ किलो गांजासह १३ लाख ६४ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( हेही वाचा : कोकणात धावली अगीनगाडी…; जन्माची तिच्या अद्भुत कहाणी )
आठ लाखांचा गांजा
सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारांस धुळ्याकडून चाळीसगावकडे येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्कार्पीओ गाडीला नंबर प्लेट नव्हती म्हणून ही गाडी पोलिसांनी नाकाबंदीत अडवली. ए. पी. आय. तुषार देवरे यांनी विना नंबर प्लेट प्रकरणी या स्कार्पीओवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देताच, ही गाडी चाळीसगावच्या दिशेने पळवून नेण्याचा प्रयत्न चालकाने केला. त्याच्या या कृतीने पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी लागेच हे वाहन अडवून तपासले असता त्यात गांजा आढळला. जळगाव शहर पोलिसांनी चालक आणि अन्य एकाला ताब्यात घेत ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले.
गुन्हा दाखल
तुषार अरुण काटकर (२८) आणि सुनील देवीदास वेडस्कर (३८) ही स्कॉर्पीओमधील दोघांची नावे आहेत. या गाडीत ५८ किलो गांजा आढळला असून या गांजाची किंमत ८ लाख ७३ हजार आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत शहर वाहतूक शाखेचे ए. पी. आय. तुषार देवरे यांच्या फिर्यादीवरुन तुषार काटकर आणि सुनील बेडीस्कर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंग हे करीत आहेत.
Join Our WhatsApp Community