व्हीजेटीआयमधील सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय टेक्निकल फेस्ट ‘स्थापत्य २०२२’ चे २३, २४ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी नोंदणी रविवार, १० एप्रिलपासून सुरु झाली असून ही नोंदणी २२ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.
मागील वर्षी देश-विदेशातून स्पर्धक सहभागी झाले होते
स्थापत्य २०२२ ही स्पर्धा विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य, कल्पना त्यांची बुद्धमता दाखवण्याची उत्तम संधी आहे. बेस्ट टॅलेंट जगासमोर आणण्यासाठी या स्पर्धेचा वापर होणार आहे. त्याकरता विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीसे देण्यात येणार आहेत. मागील वर्षी देशातील विविध आयआयटी, एनआयटी आणि कॅनडा, दक्षिण आफ्रिका या देशांमधून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत जे विद्यार्थी सहभागी होऊ इच्छित आहेत त्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याकरता
http://www.cesavjti.com ही लिंक देण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी हिंदुस्थान पोस्ट मीडिया पार्टनर आहे.
Join Our WhatsApp Community